Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Pune › नवव्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

नवव्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

Published On: Feb 27 2018 6:52PM | Last Updated: Feb 27 2018 6:52PMपिंपरी चिंचवडः प्रतिनिधी

पिंपरी चिंचवडमध्ये दीड वर्षीय चिमुरडीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

अनिका तोमर असे तिचे नाव आहे. सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. हे कुटुंब मेट्रो पोलिटीन हौसिंग सोसायटीच्या इ विंगमध्ये राहायला होते. आई, आजी आणि आजोबा घरातच होते, तेंव्हा ती बाल्कनीत खेळत होती. खेळत असताना ती ग्रीलवर चढली आणि तिचा तोल जाऊन थेट खाली पडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.