पिंपरी : प्रतिनिधी
तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष यांच्या भावाला पिस्तूलाचा धाक दाखवून १४ तोळे वजनाचे दागिने चोरले. हा प्रकार शनिवारी दुपारी बारा वाजता वाल्हेकरवाडी येथील कारनिव्हल हॉटेलच्या पाठीमागे घडला.
दिलीप वाल्हेकर यांच्या कार्यालयात घुसून दोघांनी दागिने लंपास केले आहेत. दिलीप हे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर यांचे बंधू आहेत. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. मात्र भरदुपारी घडलेल्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.