Fri, Nov 16, 2018 04:29होमपेज › Pune › बेवारस कुत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल (Video)

पुणे : बेवारस कुत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका (Video)

Published On: Jul 04 2018 12:19PM | Last Updated: Jul 04 2018 12:40PMपुणे : प्रतिनिधी

शंकरशेठ रस्त्यावरील गुरुनानक नगरमधील त्रस्त नागरिकांनी बेवारस कुत्री आणि मांजरांना त्रासाला कंटाळून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती रहिवासी अनिल कालरा, महेंद्र धावडे आणि अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुनानक नगरमध्ये मिशन पोसीबल ही संस्था बेवारस कुत्री आणि मांजरांचा सांभाळ करते. सध्या या संस्थेकडे 200 कुत्री आणि 150 मांजरी असून तेथील विष्ठा, हाडे आणि सडलेल्या अन्नामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत महापालिकेचे आरोग्य खाते आणि अतिक्रमण विभाग यांची पाहणी करून ही संस्था बेकायदा असल्याचे मान्य केल्याचे, कालरा यांनी सांगितले.

संस्थेला सासवड येथील अमृतसिंह जाधवराव यांनी २ एकर जागा दिली असून पाच वर्षात अद्याप या संस्थेचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे या रहिवाशांची समस्या लक्षात घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असल्याची माहिती अॅड. श्रीवास्तव यांनी दिली. दरम्यान, या संस्थेचे प्रमुख डॉ. रवी कसबेकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.