Wed, Nov 14, 2018 20:56होमपेज › Pune › पुणेः पती-पत्नीच्या संबंधाचे छुपे चित्रीकरण 

पुणेः पती-पत्नीच्या संबंधाचे छुपे चित्रीकरण 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रातिनिधी

पती-पत्नीचे आक्षेपार्ह चित्रीकरण करून, ते  मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये ठेवून, ते चित्रीकरण संबंधित महिलेस दाखवण्याचा धक्कादायक प्रकार सुसगाव येथे घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल असलेल्याने यापूर्वीही अशाच प्रकारचे चित्रीकरण केल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी पीडित 29 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली आहे, तर कुंदन अष्टे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल असलेला कुंदन अष्टे हा पीडित महिलेच्या परिसरात राहण्यास आहे. तो गेल्या तीन महिन्यांपासून पीडित महिला आणि तिच्या पती यांच्यातील संबंधाचे चित्रीकरण   सेल्फी स्टिकच्या मदतीने करत होता. 

हे सर्व ‘व्हिडिओ’ त्याने लॅपटॉपमध्ये ठेवले होते. त्याने ते चित्रीकरण संबंधित महिलेला दाखविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे चित्रीकरण त्याने करून ते दाखवले आहे. त्यामुळे पीडित  महिलेने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली आहे.