Wed, Jul 24, 2019 08:11होमपेज › Pune › पुणे : पालखीतील वारकर्‍याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

पुणे : पालखीतील वारकर्‍याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

Published On: Jul 15 2018 12:50PM | Last Updated: Jul 15 2018 12:50PMवालचंदनगर : प्रतिनिधी

अंथूर्णे (ता. इंदापूर) येथे पालखी सोहळ्यात चाललेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून संजय मुकुंदा कांबळे (वय ५० अंदाजे, रा. अंथूर्णे ता. इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रविवार दि.१५ रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बेलवाडी येथील रिंगण सोहळा आटोपून निमगाव केतकी या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्त होत असताना ही घटना घडली आहे. सकाळी साडे अकरा वाजता रस्त्याच्या डाव्या बाजूने वारकऱ्यांची प्रचंड गर्दी होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहने सुरु होती. अशावेळी गावाच्या मुख्य चौकालगत गावातील नागरिकांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केलेली होती. दरम्यान यावेळी कांबळे यांचा या पालखी सोहळ्यातील ट्रकच्या (क्र. एमएच ०४, डीके ९६९४) मागच्या चाकाखाली तोल गेला आणि त्यांच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कांबळे यांच्यासोबत लहान मुलगा होता. मुलगा ट्रकच्या दिशेला जाऊ लागल्याने मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. दरम्यान या घटनेनंतर बराच वेळ घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.