Fri, Apr 19, 2019 12:35होमपेज › Pune › संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीतून मार्गस्थ

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीतून मार्गस्थ

Published On: Jul 14 2018 10:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:29AMबारामती : प्रतिनिधी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी ( दि.१४) सकाळी सहा वाजता बारामतीतून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. शनिवारी सकाळी दहा वाजता सोहळ्यातील पहिले मेंढ्यांचे रिंगण बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे पार पडेल. 

शुक्रवारी सायंकाळी सात वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीत विसावला होता. बारामतीकरांनी मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांची सेवा केली. पहाटे सोहळ्याची महापूजा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडल्यानंतर सोहळ्याला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पालखीचा शनिवारचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील सणसर येथे असेल.