Sun, Mar 24, 2019 06:34होमपेज › Pune › पुणे :  बेलवाडीत अश्वाचे पहिले रिंगण (video)   

पुणे :  बेलवाडीत अश्वाचे पहिले रिंगण (video) 

Published On: Jul 15 2018 12:27PM | Last Updated: Jul 15 2018 12:27PMवालचंदनगर : धनंजय थोरात

विठोबा-रखुमाई, ज्ञानोबा-तुकाराम,  माऊली-माऊली नामाचा गजर करत,  टाळ मृदुंगाच्या गजराने आसमंताला गवसणी घालणाऱ्या लाखो वैष्णवांच्या साक्षीने रविवार दि.१५ रोजी बेलवाडी ता.इंदापूर येथे जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री.तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साही वातावरणात पार पडले.

या रिंगण सोहळ्‍यात संत तुकाराम महाराज पालखी तळावर रांगोळीतून विठ्ठलाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या रिंगण सोहळ्‍यासाठी लाखो वैष्णवांनी हरिनामाच्या गजराने आसमंताला गवसणी घातली होती. या  रिंगण सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांनी पताका हातात घेऊन गोल रिंगणाला प्रदक्षिणा घातली.

या रिंगण सोह्ल्यावेळी डोक्यावर तुळशी घेऊन देहभान हरपून वारकरी भगिनी प्रदक्षिणा व फुगडी घालत होत्या.या  रिंगण सोहळ्यात वाऱ्याच्या वेगाने देवाचे अश्व धावले.   या  रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून आमदार दत्तात्रय भरणे यांनी आनंद व्यक्त केला.