Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Pune › चार वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेलं ग्रहण कायम : धनंजय मुंडे 

चार वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेलं ग्रहण कायम : धनंजय मुंडे 

Published On: Feb 01 2018 3:45PM | Last Updated: Feb 01 2018 3:46PM पुणे : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्‍प हा ऐतिहासिक अर्थसंकल्‍प असल्‍याचे म्‍हंटले असताना, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या अर्थसंकल्‍पावर बोलताना काल चंद्राला लागलेलं ग्रहण काही वेळातच संपले पण भारतीय अर्थव्यवस्थेला चार वर्षांपूर्वी लागलेलं ग्रहण अजूनही कायम आहे असचं आजच्या बजेटचं वर्णन करावं लागेल. अशी उपरोधीक टीका त्‍यांनी केली आहे.  

शेतक-यांना उत्पादनावर दीड पट भाव मिळवून देण्याचे आश्वासन चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण करता आले नाही. आता यावर नीती आयोग अभ्यास सुरू करणार आहे. त्यामुळे २०२० पर्यंत भाव दीड पट करण्याचे नवीन गाजर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या अर्थसंकल्‍पात दाखवले आहे. असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्‍हणाले.

GST लागू केल्यानंतर प्रत्यक्ष करात कपात करण्याचे आश्वासन अरूण जेटली यांनी दिले होते मात्र यंदाच्या अर्थसंकल्‍पात मध्ये प्रत्यक्ष करात वाढ करून व आयकरात कपात न करण्याचे धोरण ठेवून अगोदरच वाढलेल्या महागाईला आमंत्रण दिले असल्‍याने सर्व स्तरातील जनतेची निराशा झाली आहे 

नोटाबंदीमुळे उद्योगांना झालेल्या नुकसानीपोटी त्यांना पॅकेज दिले.  नोटाबंदीमुळे कृषी क्षेत्राचे 60 ते 70 हजार कोटी रुपयांचे जे नुकसान झाले आहे त्या बाबत मात्र अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद न केल्याचे दिसत नाही त्‍यामुळे या अर्थसंकल्‍पात  शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केल्‍याची टिका त्‍यांनी केली.

तसेच गरीब महिलांना  मोफत गॅस कनेक्शन देण्याच्या जेटली यांनी केलेल्‍या घोषनेवर बोलताना वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे या गरीब महिलांना हा गॅस परवडेल का ? याचा विचार या अर्थसंकल्‍पात दिसत नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हंटले आहे.काहीशे अंकांनी घसरलेला शेयर बाजारचं लोकांची अर्थसंकल्पाबाबतची नाराजी सांगायला पुरेसा आहे. असेही ते यावेळी म्‍हणाले.

Image may contain: 1 person, smiling, meme and text

Image may contain: 1 person, text