होमपेज › Pune › एक मे पासून राज्यात ऑनलाईन ७/१२

एक मे पासून राज्यात ऑनलाईन ७/१२

Published On: Apr 25 2018 8:16PM | Last Updated: Apr 25 2018 8:16PM
पुणे :  पुढारी ऑनलाईन

१  मे २०१८ पासून राज्यातील शेतकर्‍यांना ऑनलाईन सातबारा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. पुणे जिल्हा परिषदेतील एका कार्यक्रमानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी नोंदणी मुंद्राक आयुक्त अनिल कवडे, जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम,  सांगलीचे मुंद्राक जिल्हाधिकारी गोविंद कराड आदी उपस्थिंत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,  शेतकर्‌यांना अचूक संगणकीकृत ७/१२ देण्यासाठी शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने कार्यक्रम हाती घेतले आहे. राज्यात ४३ हजार ९४८ महसूली गावांपैकी ४० हजार ७७८ गावांमध्ये ७/१२ ऑनलाईन मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  अद्याप ३००० गावातील संगणीकरणाचे काम बाकी आहे. एक मे पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

पुणे, सातारा जिल्ह्यात ५० टक्क्‌यापेक्षा अधिक तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काम २० टक्क्‌यांपेक्षा कमी आहे. राज्यातील सताबारा उतारा २००२ पासून संगणकीकृत करण्यात आले होते. मात्र, त्यात मोठ्याप्रमाणात चुका आढळून येत होत्या. त्यामुळे शेतकर्‌यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतकर्यांना अचूक संगणकीकृत ७/१२ देण्यासाठी राज्यच्या भूमि अभिलेख शाखेकडून केंद्र पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसित केली आहे. त्याआधारे राज्यात ई-फेरफार करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवह्या तयार केल्या जात आहेत. राज्यातील संबंधित महसूल यंत्रणेला सातबाराचा सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत सातबारा व आठ अ साठी २४ मुद्यांवर तपासणी केली जात आहे.    

महसूल विभागाकडून अतापर्यंत अनेकवेळा संपूर्ण राज्यात सातबारा ऑनलाईन मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र, आनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे ही प्रकिया खोळंबत राहिली. मात्र आता महसूल मंत्र्यांनी नव्याने घोषणा केली आहे. एक मेचा महुर्त साधून ऑनलाईन सातबारा राज्यात सुरु करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, विशिम, उस्मानाबाद, जालना, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात १०० टक्के काम झाले आहे. तर १९ जिल्ह्यामध्ये ९० टक्क्‌यांपेक्षा अधिक काम झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्हा ५५ टक्के, सातार ५०.२६ टक्के  आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १९.९७ टक्के सातबारा ऑनलाईन झाले आहेत. सर्वात कमी कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा १७.९७ आणि रत्नागिररीमध्ये केवळ ११.७६ टक्के काम पूर्ण झाले आहे

Tags : pune, chandrakant patil, 7/12,