Thu, Sep 19, 2019 03:33होमपेज › Pune › पुणे : पिंपरीत वादातून एकावर गोळीबार

पुणे : पिंपरीत वादातून एकावर गोळीबार

Published On: Dec 22 2017 4:58PM | Last Updated: Dec 22 2017 5:23PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी येथील सिटी मॉल मध्ये झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या पाठीमागे आज दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. यामध्ये पंकज फुगे (वय २३, भोसरी) असे जखमीचे नाव आहे. 

पिंपरीतील सिटी मॉलमध्ये काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणातून भोसरी येथील अंकुशराव लांगडे गभागृहाच्या मागे एकाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात गोळी पंकज फुगे यांना घासून गेली. यात पंकज जखमी झाला आहे. 

हा गोळीबार अशिंक्य माने याने केला असल्याचे फुगे यांनी पोलिसांनी सांगितले. तर गोळीबार करणार्‍याची ओळख पटलेली असून माने याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्‍थळी आरोपीची दुचाकी आणि एक रिकामी पुंगळी आढळली आहे.

याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.