Thu, Jul 18, 2019 21:43होमपेज › Pune › निगडीत विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू 

निगडीत विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू 

Published On: Jun 27 2018 9:49AM | Last Updated: Jun 27 2018 9:49AMपिंपरी : प्रतिनिधी

विजेच्या धक्क्याने एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.  हरीओम विनायक नराल  असे मृत्‍यू झालेल्‍या बालकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटा स्कीम येथील  रस्त्यावर खेळत होता. तो विजेच्या खांबाजवळ गेला असताना त्यास विजेचा जोरदार झटका बसला व तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.