Sat, Apr 20, 2019 09:59होमपेज › Pune › पुणे : पु. ल. देशपांडे यांचे घर फोडणाऱ्यास अटक

पुणे : पु. ल. देशपांडे यांचे घर फोडणाऱ्यास अटक

Published On: Jun 25 2018 10:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:14AMपुणे : प्रतिनिधी

प्रसिद्ध नाटककार आणि लेखक पु. ल. देशपांडे यांचे घर फोडणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. जितसिंग राजपालसिंग टाक (वय 24) असे अटक करण्यास आल्याचे नाव आहे. डिसेंबर 2017 मध्ये ही घटना घडली होती. 

डेक्कन भागातील भांडांरकर रस्त्यावर पु. ल. यांचे मालती माधव अपार्टमेंटमध्ये घर आहे. त्याठिकाणी कोणीही राहत नाही. परंतु, येथे पु. लं.चे साहित्य आहे. गेल्या वर्षी, (19 डिसेंबर 2017) मध्यरात्री चोरट्यांनी पु.ल. चे घर फोडले होते. मात्र, त्या ठिकानावरून काहीच गेले नव्हते. 

याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलिस करत होते. मात्र,चोरट्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट एकला याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील व पथकाने त्याला पकडले आहे. त्याच्याकडून पु.ल. यांच्या घरफोडीसह आणखी घटना उघडकीस आल्या आहेत.