होमपेज › Pune › बारामती तालुक्यात आणखी एक कोरोनाग्रस्त

बारामती तालुक्यात आणखी एक कोरोनाग्रस्त

Last Updated: May 25 2020 1:52PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा 

मुंबईहून गेल्या आठवड्यात बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे आलेल्या एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेवर पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बारामती तालुक्यातील हा चौदावा रुग्ण आहे. यासंबंधीची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

लोणी भापकर येथील हे ज्येष्ठ दांपत्य मुंबईत घाटकोपर येथे राहते. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून ते १८ मे रोजी बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे आले होते. आरोग्य विभागाने त्यांना लागलीच ताब्यात घेत बारामतीतील रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. या दोघांचीही २१ तारखेला कोरोना चाचणी घेण्यात आली. दोघेही निगेटिव्ह असल्याने या दोघांपैकी तिच्या पतीला घरी सोडण्यात आले. परंतु महिलेला दम लागत असल्याने पुढील उपचारांसाठी रुईतून औंधला हलविण्यात आले होते. तेथे २४ रोजी तिचे स्वॅब घेण्यात आले. सोमवारी ( दि. २५ ) अहवाल आला असता ती पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. बारामती तालुक्यातील ती चौदावी रुग्ण ठरली आहे. 

वाचा : गडद संकटाची चाहुल; राज्य सरकारने थेट केरळमधून डॉक्टर, परिचारिका मागवल्या!

पुण्या- मुंबईने वाढवला धोका 

कोरोनाचा पुण्या- मुंबईतील वाढता धोका लक्षात घेत अनेक जण बारामती तालुक्यात परतत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या शहरातून तालुक्यात आलेले रुग्णच सापडत आहे. कायम येथे राहणारा एकही रुग्ण सध्या आढळत नाही. त्यामुळे या शहरांनी ग्रामीण भागाचा धोका चांगलाच वाढवला आहे. या महिलेल्या पतीसह तिच्यासोबत औंधला असलेला मुलगा, सून व दोन नातवंडे या पाच जणांची आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी केली जाणार आहे.