Sat, Nov 17, 2018 03:59होमपेज › Pune › वयोवृद्ध मावळकन्येची रायगडावर चढाई

वयोवृद्ध मावळकन्येची रायगडावर चढाई

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:04AMखडकवासला : वार्ताहर

शिवराज्याभिषेक दिन जवळ आल्याने राज्य तसेच देशभरातील तमाम शिवभक्तांना रायगडाचे वेध लागले आहे. आयुष्यात कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड न पाहिलेल्या एका वयोवृद्ध मावळकन्येने रणरणत्या उन्हात रायगडावर चढाई करून शिवरायांना अनोखी  मानवंदना दिली. 

प्रतिकूल परिस्थितीत मुठभर मावळ्यांच्या साथीने हिदंवी स्वराज्याची स्थापना करून जगातील पहिले लोककल्याणकारी राज्य मावळ खोर्‍यात निर्माण केले. लहानपणापासून शिवरायांच्या शौर्य, मानवतावादी कार्याच्या कथा वाड वडिलांकडून ऐकल्या मात्र शिवरायांच्या  किल्ल्यावर  जाता आले नाही. वय झाल्याने व आजारपणामुळे रायगड पाहण्याचे स्वप्न कसे पूर्ण याची चिंता अनेक वर्षांपासून मनात असलेल्या वयोवृद्ध मावळकन्येने शिवरायांवरील निस्सिम भक्तीपोटी, रायगडावर  पायी चढाई केली. 

धोंडाबाई जाणू खाटपे असे या 72  वर्षांच्या वयोवृद्ध मावळकन्येचे नाव आहे. त्या भोर जवळील वाठार येथील आहेत. रायगडावर चढाई करताना  धोंडाबाई यांनी गडाच्या महादरवाजाच्या पायरीवर माथा टेकला. एका हातातल्या  काठीच्या आधाराने त्यांनी चार तासात गड सर केला.  काशी यात्रेचे पुण्य रायगड वारीने मिळाले असे उदगार त्यांनी काढले.