Tue, Sep 25, 2018 08:32होमपेज › Pune › जेजुरी येथील भुलेश्वर आश्रमातील सेवकाचा खून 

जेजुरी येथील भुलेश्वर आश्रमातील सेवकाचा खून 

Published On: May 07 2018 11:26PM | Last Updated: May 07 2018 11:26PMजेजुरी : वार्ताहर

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिराच्या घाट परिसरातील ओम शक्ती बाबा आश्रमातील सेवकाचा अज्ञातांनी खून केला आहे. दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय, ७० रा.भरतगाव ता.दौंड जि. पुणे  )असे खून झालेल्‍या सेवकाचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने टेमगिरे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला. 

याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाच्या हद्दीतील भुलेश्वर घाटाच्या परिसरात ओम शक्ती बाबा आश्रम आहे. या आश्रमातील  सेवक दगडू टेमगिरे या वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत सोमवार दि.७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेजुरी पोलिसांना माहिती मिळाली. भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव,जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.एस.हाके, पोलिस उपनिरीक्षक राजेश मालेगावे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा व तपास कार्याला सुरुवात केली आहे. 

 

Tags : pune district jejuri, murder