Thu, Apr 18, 2019 16:27होमपेज › Pune › कँप परिसरात मारहाण करून वृद्धाचा खून

पुणे : कँप परिसरात मारहाण करून वृद्धाचा खून

Published On: Feb 02 2018 9:34AM | Last Updated: Feb 02 2018 9:57AMपुणे : प्रतिनिधी 

कँप परिसरातील डॉ. कोयाजी रोडवर राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाला दुचाकीवरून  आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी सीमेंट ब्लॉकने मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. मृत व्यक्‍तीची ओळख अद्याप पटली नाही. 

याप्रकरणी सागर बाबूराव वाघमारे (२५, सर्व्हर्स क्वार्टर,) यांनी फिर्याद दिली आहे.  वाघमारे यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींवर जीवे मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु जखमीचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्या कोयाजी रोडरील सरकारी निवासस्थानाजवळ रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या वृद्धाला सीमेंट ब्लॉकने मारहाण करून दोन व्यक्तींनी गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादी हे तेथे सुरक्षा रक्षक म्हणून रात्रपाळीला हजर होते. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.