Wed, Nov 21, 2018 07:26होमपेज › Pune › पुणे : धनगर समाज आरक्षणासाठी वरवंड बंद

पुणे : धनगर समाज आरक्षणासाठी वरवंड बंद

Published On: Aug 13 2018 11:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:07AMयवत : वार्ताहर

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार चाल ढकल करत असल्याचा निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड गावात बंद पाळण्यात आला आहे.
 
सोमवारी सकाळपासूनच वरवंड गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून धनगर समाजाच्या बंदला पाठिंबा देण्यात आला. गावातील समाज बांधवांनी एकत्रित येत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील मुख्य बाजारपेठ व इतर  व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे.