Sat, Jul 20, 2019 02:26होमपेज › Pune › राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  महापालिकेसमोर आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  महापालिकेसमोर आंदोलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या वर्षभरातील कारभाराचा जाब विचारत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी 'महापालिका निवडणुकीत भाजपने दिलेल्या विविध आश्वासनांचे काय झाले ?'  अनधिकृत बांधकामे नियमितीकरनाचे काय झाले? शास्तीकराचे काय झाले?' 'पारदर्शक कारभाराचे काय झाले? 'बोपखेलच्या पुलाचे काय झाले? 'रिंगरोडचे काय झाले? 'नियमित पाणीपुरवठ्याचे काय झाले?' 'स्मार्ट सिटीचे काय झाले?' हॉकर्स झोनचे काय झाले? एसआरए व घरकुलचे काय झाले? शालेय शैक्षणिक सुविधांचे काय झाले? अशा घोषणा देण्यात आल्या. 

या आंदोलनात माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेविका सुमन पवळे, विनया तापकीर, गीता मंचरकर, नगरसेवक पंकज भालेकर, माजी नगरसेवक काळूराम पवार, प्रवक्ते फजल शेख, आनंदा यादव, मनीषा गटकळ, कविता खराडे, विशाल काळभोर, सुनील गव्हाणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

 

Tags : ncp youth wing, protest, bjp,  pimpri, municipal corporation, 


  •