होमपेज › Pune › फसवे सरकार बदलेपर्यंत गप्प बसणार नाही : अजित पवार 

फसवे सरकार बदलेपर्यंत गप्प बसणार नाही : अजित पवार 

Published On: Apr 14 2018 10:30AM | Last Updated: Apr 14 2018 12:02AMयेरवडा : वार्ताहर

जाती- जाती तेढ निर्माण केले जात आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली चा मास्टर माइंड कोण आहे. हे जनतेने ओळखले पाहिजे. जनतेने निवडणुकीला तयार राहावे, फसवे सरकार बदलल्या शिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.

खराडी येथे हल्लाबोल सभेच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. हल्लाबोल सभेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, महेंद्र पठारे आदी उपस्थित होते.

धनंजय मुंढे म्हणाले, खराडी येथील 34 वी हल्लाबोल सभा आहे. ही सर्व विक्रम तोडणारी सभा आहे. कमी कालावधीत जास्त घोटाळा सरकारचा बाहेर आला. अच्छे दिनची चेष्टा आता चौका-चौकात होऊ लागली आहे. 15 लाखांच्या नावावर फसविले. पेट्रोल- डिझेलचे दर वाढले. महागाई वाढली असताना लोक भुकेले राहात आहेत. असे असताना खायेगा इंडिया तो... जायेगा इंडिया अशी मिश्किल टिपण्णी मुंढे यांनी सांगितली. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोदी च्या भाषणाला पुन्हा बळी पडू नका. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम, लिंगायत समाजाची या सरकारने लटकत ठेवले आहे. मुख्यमंत्री म्हणतात पारदर्शक सरकार देण्याचे आश्वासन दिले होते.  सर्व मंत्र्यांनी मिळून 90 हजार कोटींची भ्रष्टाचार केला आहे. मी पुरावे दिले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीन चिट दिली आहे. पवार साहेबांवर टीका करण्याची मुख्यमंत्र्याची लायकी नाही.

स्वागत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केले. ते म्हणाले, मेट्रो चे काम रखडले आहे. नदी पात्रातील रस्ता वाडगावशेरीत का आढवला आहे.  भामा आसखेड योजना बंद पडली आहे. त्या बदल्यात दोनशे कोटी जादा जाणार आहेत. नाकर्ते सरकार सत्तेवर आल्यामुळे काम थांबली आहेत. सरकारला खाली खेचण्याचे  काम आपल्याला करावयाचे आहे. जयंत पाटील म्हणाले, वडगावशेरी मतदार संघातील विकास चार वर्षांत रखडला आहे. जयंत पाटील यांनी मोदींनी 15 लाख रुपयांचे आश्वासन दिलेली, रोजगार यासह सतेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची फसव्या क्लिप सभेत दाखवल्या.  उंदीर मारण्यात देखील भ्रष्ठाचार केला आहे. आभार नारायण गलांडे यांनी मानले.