Mon, Nov 19, 2018 10:29होमपेज › Pune › दुसर्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे आज उद्घाटन

दुसर्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे आज उद्घाटन

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 12:47AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित दुसर्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे उद्घाटन आज बुधवार दि.10 रोजी आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते सकाळी 10.00 वाजता होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि.10 ते 12 जानेवारी दरम्यान एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरुड येथे ही दुसरी नॅशनल टीचर्स काँग्रेस होत आहे.

आयआयटीच्या थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक प्रा.कस्तुरीलाल चोप्रा, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, मुंबईच्या आयआयटीचे माजी सहसंचालक प्रा.एस.सी.सहस्त्रबुध्दे व कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक  डॉ.संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभासाठी महापौर मुक्ता टिळक, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल डी.सहस्त्रबुध्दे, तिबेट येथील सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष डॉ. लोबसांग सांगे व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.