Wed, Apr 24, 2019 01:44होमपेज › Pune › दाभोळकर हत्या प्रकरण : राजेश बंगेराला एसआयटीकडून मारहाणाची तक्रार 

राजेश बंगेराला एसआयटीकडून मारहाणाची तक्रार 

Published On: Sep 10 2018 2:57PM | Last Updated: Sep 10 2018 2:57PMपुणे : प्रतिनिधी

राजेश बंगेराला सीबीआय कोठडीत एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार  न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे. राजेश बंगेरा, अमित दिगवेकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. शरद कालासकरच्या पोलीस कोठडीत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

सीबीआयच्या सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी उच्च न्यायालयामध्ये रिमांड रिपोर्टवर ऑरगुमेंट करायचे नाही असे सांगितल्याचा युक्तिवाद मागील पोलिस कोठडीवेळी करण्यात आला होता, परंतु बचाव पक्षाचे वकील धर्मराज यांनी उच्च न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये कुठेही असा उल्लेख नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी सीबीआय न्यायालयला खोटी माहिती पुरवत असल्याचा युक्तिवाद केला. दरम्यान सीबीआयला बंगेरा आणि दिगवेकर यांच्या तपासतील प्रगती दाखवता न आल्याने व काय तापस करायचा हे पटवून न देता आल्याने दोघांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

रिमांड रिपोर्टवर युक्तिवाद न करता डायरेक्ट केस डायरी न्यायाधीशासमोर ठेवताना न्यायालयाने सीबीआय वकिलांना काय तपास केला असा उलट सवाल करताना नाराजी व्यक्त केली. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. एम. एस. सय्यद यांच्या न्यायालयासमोर खटल्याची सुनावणी झाली. दिगवेकर आणि बंगेराची पोलिस कोठडी न घेता येणाऱ्या सीबीआयला सोमवारी नामुष्की पत्करावी लागली.