Fri, May 24, 2019 03:11होमपेज › Pune › पुण्यात नारायण राणे आजही काँग्रेसमध्येच

पुण्यात नारायण राणे आजही काँग्रेसमध्येच

Published On: Mar 19 2018 4:55PM | Last Updated: Mar 19 2018 7:25PMपुणे : हिरा सरवदे 

काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नारायण राणे यांनी  दिल्लीतील नेत्यांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांना  झोडपून काढले. राणे यांनी पक्ष सोडून सहा महिन्यांचा कालावधी उलटत आला. आत्ता ते भाजपकडून राज्यसभेचे खासदार होणार आहेत, तरीही पुण्याच्या काँग्रेसभवनमध्ये आजही राणे यांचा फोटो झळकत आहे. 

नेहमीच बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते म्हणून संपूर्ण राज्यास परिचीत असणारे नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर वारंवार राज्यातील काँग्रेस नेत्यावर टिकेची झोड उठवत दिल्लीतील नेत्यांचे लक्ष आपल्यावर केंद्रीत केले. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केल्यानंतर तर त्यांनी केंद्रातील नेत्यांवरही टिका केली होती. मात्र त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या टिकेकडे वरीष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केले.

अधिक वाचा

राजू शेट्टींची 'हात' मिळवणी? (व्हिडिओ)

राणे यांच्या तडकाफडकी स्वभावामुळे त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये आलेले आमदार आणि नेतेही त्यांच्यापासून दुरावले. त्यानंतर नारायण राणे यांचे काँग्रेसमधील महत्त्व थोडेसे कमी झाले होते. गोवा विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्ता स्थापनेची समीकरणे जुळवण्याची जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपवली नाही, त्यामुळे सत्ता गमवावी लागली, असा आरोप करत राणे यांनी जाहीरपणे पक्ष नेतृत्त्वासह वरिष्ठ नेत्यांवर टिका केली. त्यानंतरही काँग्रेसने राणे यांना विधानपरिषदेत पाठवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही ते पक्षावर नाराजच होते. अखेर त्यांनी सप्टेबर २०१७ मध्ये काँग्रेसच्या नेत्यांवर टिकेची झोड उठवत पक्षाला सोडचिट्टी देत विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी सातत्याने काँग्रेसच्या दिल्लीतील आणि राज्यातील नेत्यांवर टिका केली.

राणे यांनी पक्ष सोडून सहा महिन्याचा कालावधी उलटत आला. ते भाजपकडून राज्यसभेचे खासदारही होणार आहेत., तरीही पुण्याच्या काँग्रेस भवनमधील फलकावरून त्यांचा फोटो हटविलेला नाही. काँग्रेस भवनच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आजही त्यांचा फोटो झळकत आहे. व्यसपीठाच्या मागील बाजूस लावलेल्या बॅनरवर दिल्ली व राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो आहेत. या फोटोंमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर नारायण राणे यांचा फोटो आहे. राणे यांच्या फोटोनंतर विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो आहे. याच हॉलमध्ये सर्व नेत्यांच्या पत्रकार परिषदा घेतल्या जातात. दुसरीकडे मात्र व्यासपीठाच्या समोरील भिंतीवर लावलेल्या बॅनरवरील राणे यांच्या फोटोवर कोरा कागद चिकटवण्यात आलेला आहे.

Tags : narayan rane, photo, pune congress office, pune news, congress, swabhiman party, NCP, Nitesh Rane, Nilesh Rane