Sat, Jan 19, 2019 10:18होमपेज › Pune › ‘स्थायी समिती’तून मोहोळ बाहेर

‘स्थायी समिती’तून मोहोळ बाहेर

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समितीमधून विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनाच बाहेर पडावे लागले आहे. स्थायी समितीच्या लॉटरीत मोहोळ यांच्यासह सत्ताधारी भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेस व शिवसेना यांचा प्रत्येकी एका सदस्यांची चिठ्ठी बुधवारी निघाली. या सर्व सदस्यांना फेब्रुवारी अखेरिस स्थायीतून निवृत व्हावे लागणार आहे.

महापालिकेच्या 16 सदस्य असलेल्या स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे, मात्र   महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्वात येणार्‍या पहिल्या स्थायी समितीमधील 8  सदस्यांची मुदत केवळ एक वर्षांची असते. या आठ सदस्यांना चिठ्या टाकून लॉटरी पध्दतीने त्यांची नावे काढली जातात. गुरूवारी महापालिकेत 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांसाठी चिठ्या टाकून लॉटरी काढण्यात आली. त्यात सत्ताधारी भाजपचे 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेस व शिवसेना यांच्या प्रत्येकी 1 अशा 8 सदस्यांच्या नावाच्या चिठ्या निघाल्या, त्यात विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांनाही आता स्थायीतून बाहेर पडावे लागणार आहे. दरम्यान या निवृत्त होणार्‍या सर्व सदस्यांची अंतिम मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे, तर त्यांच्या जागी नव्याने 8  सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या मुख्यसभेत निवड केली जाणार आहे.