Wed, Nov 21, 2018 03:30होमपेज › Pune › पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

Published On: Feb 12 2018 10:04AM | Last Updated: Feb 12 2018 10:04AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील सिहंगड रोड परिसरात पूर्ववैमन्यस्यातून युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

यामध्ये अभिषेक बाळासाहेब पोकळे (वय २५) याचा खून झाला आहे. याप्रकरणी विशाल सेवकानंद वाघ (वय २९), सुधीर शिकांत घुगे (वय ३२) व विकास विश्वनाथ पोकळे (वय २६) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

मृत अभिषेक आणि आरोपींमध्ये तीन महिन्यापूर्वी वाद झाला होता. याप्रकरणी सिहंगड पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रविवारी संशयित आरोपी आणि फिर्यादी हे एकत्र दारू पित बसले होते. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता संशयित आरोपींनी पूर्वीच्या वादावरून अभिषेक याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करून पसार झाले. सिहंगड पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यानंतर संशयित आरोपींचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले.