पुणे : प्रतिनिधी
कोरेगावं पार्क परिसरातील बार्टी संस्थेच्या जवळील साधुवासवानी पुलाखाली एका फिरस्त्याचा मध्यरात्री डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनू (वय 29) असे खून झालेल्याचे नाव आहे.
सोनू हा फिरस्ता असून, तो भिक्षा मागून पोट भरत होता आणि याच भागात फुटपाथ व साधुवासवानी पुला खाली झोपत असे. रविवारी सकाळी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. कोरेगावं पार्क पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घडल्या प्रकाराची पाहणी केली.
दरम्यान खून का झाला व कोणी केला, याचा तपास सुरू आहे.
Tags : pune, Koregaon Park. murder