Sun, May 26, 2019 08:59होमपेज › Pune › कात्रजमध्ये सुरक्षा रक्षकचा खून; हत्येचे कारण अस्पष्ट

कात्रजमध्ये सुरक्षा रक्षकचा खून; हत्येचे कारण अस्पष्ट

Published On: Jan 28 2018 1:23PM | Last Updated: Jan 28 2018 1:23PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील कात्रज जुन्या बोगद्याजवळ असणाऱ्या एका शोरूमच्या सुरक्षा रक्षकाचा वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला आहे. दरम्यान हल्लेखोराचा तपास सुरू असून, खुनाचे कारण ही आस्पष्ट आहे.

आरिफ पठाण (४५) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. पठाण एका शोरूममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस होते. रात्र पाळीला ते काम करत. दरम्यान आज दुपारी येथील एक तरुण तेथे आला. त्याने पठाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. अधिक तपास भारती विद्यपीठ पोलिस करत आहेत.