Sat, Apr 20, 2019 16:39होमपेज › Pune › पती-पत्नीच्या भांडणात मेव्हणीचा खून 

पती-पत्नीच्या भांडणात मेव्हणीचा खून 

Published On: May 18 2018 9:17AM | Last Updated: May 18 2018 9:17AMपिंपरी : प्रतिनिधी 

घरगुती वादातुन सुरु असलेली पती-पत्नीची भांडणे सोडविण्यास गेलेल्या मेव्हणीचा दाजीने व एका अल्पवयीन मुलाने खून केला. हा प्रकार बावधन येथे गुरुवारी रात्री  घडला.

मुन्नीबाई देवा जाधव (२५, रा. भूंडे वस्ती, बावधन) या महिलेचा खून झाला आहे. तर दाजी हिरा देवू चव्हाण (३०, रा. गांधीवस्ती, पाषाण) आणि एका अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी  देवा खेमू जाधव (३०, रा. बावधन) याने फिर्याद दिली आहे. तर लक्ष्मी हिरा जाधव ही जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितिनुसा हिरा आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण सुरु होते. हिरा पत्नी लक्ष्मीला मारहाण करत होता यामध्ये ती जखमी झाली होती. त्यामुळे मुन्नीबाई भांडण सोडविण्यास गेली. त्यावेळी अल्पवयीन मुलाने मुन्नीबाईच्या डोक्यात फुकारिने मारहाण केली तर हिराने ढकलून दिले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मुन्नीबाईचा मुत्यू झाला. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.