Wed, Sep 26, 2018 10:43होमपेज › Pune › पुणे : दहीहंडी फ्लेक्सच्या वादातून तरुणाची हत्या

पुणे : दहीहंडी फ्लेक्सच्या वादातून तरुणाची हत्या

Published On: Sep 01 2018 8:06AM | Last Updated: Sep 01 2018 8:06AMपुणे : प्रतिनिधी

दहीहंडीचे फ्लेक्स लावण्याच्या वादातून पुण्यातील सिंहगड भागात टोळक्याने तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, अद्याप एकाही हल्लेखोराला पकण्यात आलेले नाही. मध्यरात्री ही घटना माणिकबाग परिसरात घडली. अक्षय अशोक गडशी (वय २३, माणिकबाग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, निलेश चौधरी, सागर दारवडकर व त्यांच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी व अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून ५ जणांनी मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वारकरून खून केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. फ्लेक्सच्या वादातून खून झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.