Tue, Jun 18, 2019 20:44होमपेज › Pune ›

पालिकेला आर्थिक झटका
 

पालिकेला आर्थिक झटका
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी

नवीन आर्थिक वर्षात महापालिकेस वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) मिळणार्‍या अनुदानात 8 टक्‍के वाढ होणे अपेक्षित असताना, शासनाने या अनुदानाला 6 कोटींची कात्री लावली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून महापालिकेला तब्बल 450 कोटींचा आर्थिक झटका बसणार आहे, याचा थेट परिणाम महापालिकेच्या अंदाजपत्रकावर होणार आहे.

केंद्र शासनाने गतवर्षी दि. 1 जुलैपासून जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे महापालिकेचा स्थानिक संस्था कर आणि त्यापोटीचे अनुदान बंद झाले आहे. त्या बदल्यात आता राज्य शासनाकडून महापालिकेला जीएसटीचे अनुदान देण्यात येत आहे. त्यात पुणे महापालिकेसाठी दरमहा 137 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. हे अनुदान मंजूर करताना, दरवर्षी त्यात 8 टक्‍केवाढ करण्याचे आश्‍वासनही शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार गेली आठ महिने महापालिकेस नियमितपणे हे अनुदान मिळालेले आहे. आता चालू वर्षात 156 कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळणे अपेक्षित होते; मात्र शासनाकडून हे अनुदान चक्‍क 6 कोटींनी कमी करत, जीएसटी अनुदानापोटी एप्रील 2018 या महिन्यासाठी 131 कोटी 20 लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Tags : Pune, municipal corporation, financial, loss