Wed, Sep 19, 2018 08:37होमपेज › Pune › मल्टीप्लेक्स: खाद्य पदार्थांचे दर आठ दिवसात कमी करा अन्यथा..: मनसे

दर आठ दिवसात कमी करा अन्यथा..: मनसे

Published On: Jul 02 2018 2:52PM | Last Updated: Jul 02 2018 4:05PMपुणे : प्रतिनिधी

मल्टीप्लेक्समधील खाद्य पदार्थांच्या किमती आठ दिवसात कमी कराव्यात, नागरिकांना घरचे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेण्याची परवानगी देण्यात यावी. जर परवानगी देण्यात आली नाही तर यापुढे आंदोलनाद्वारे जे काही होईल त्याची जवाबदारी सरकारने आणि पुणे पोलीस यांना स्वीकारावे लागेल, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.

यावेळी सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगरसेवक किशोर शिंदे उपस्थित होते. शालिनी ठाकरे म्हणाल्या, आमच्यावर पुणे पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले आहे. आमच्यावर न्यायाच्या बाजूने असलेले गुन्हे दाखल करावे. तसेच, मॉलमध्येपार्किंगचे पैसेसुद्धा कमी करण्यात यावे.