Thu, Jun 20, 2019 06:32होमपेज › Pune › ‘एमपीएससी’मध्ये जळगावचे राजपूत राज्यात पहिले 

‘एमपीएससी’मध्ये जळगावचे राजपूत राज्यात पहिले 

Published On: May 30 2018 10:53PM | Last Updated: May 30 2018 11:34PMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जळगावचे रोहित राजेंद्रसिंह राजपूत पहिले, तर सुधीर पाटील दुसरे, सोपान टोणपे तिसरे, अजयकुमार नष्टे चौथे, तर दत्तू शेवाळे  पाचवे आले आहेत. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील रोहिणी नर्‍हे या राज्यात प्रथम आल्या आहेत. रोहितकुमार मूळचे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील असून सध्या मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आईवडिलांचा घरगुती फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. पुण्यातील सीओईपीमधून त्यांनी 2014 मध्ये कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. 

विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येईल. तिथे निकालासह ‘कट ऑफ’ गुण देखील जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सेवा पूर्वपरीक्षा गेल्या वर्षी 2 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेसाठी 1 लाख 98 हजार 599 उमेदवार पात्र ठरले होते. मुख्य परीक्षेसाठी 4 हजार 839 उमेदवार पात्र ठरले होते. 

Tags : mpsc results, maharashtra state,  Rohitkumar Rajput