Mon, Jun 01, 2020 02:11होमपेज › Pune › शरद पवारांकडून उदयनराजेंची मनधरणी; पुण्यात घेतली भेट

शरद पवारांकडून उदयनराजेंची मनधरणी

Published On: Sep 12 2019 10:25AM | Last Updated: Sep 12 2019 12:55PM

खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवारपुणे : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. आज (गुरुवार) सकाळी १० वाजता त्यांची भेट ठरली होती. त्यानुसार उदयनराजे पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंची मनधरणी केल्याचे समजते. 

उदयनराजे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.

पवार यांच्या सोबतच्या भेटीनंतर उदयनराजे यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल याची नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

भाजप प्रवेशाबाबत चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत भाजप पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांशी उदयनराजेंची सुमारे दीड तास चर्चा झाली. मात्र, तरीही प्रवेशाचा निर्णय गुलदस्त्यात राहिला. 

उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे, याबाबत त्यांनी समर्थकांशी चर्चा केली होती.