Wed, May 22, 2019 16:49होमपेज › Pune › वाहतूक पोलिसालाच लगावली कानशिलात

वाहतूक पोलिसालाच लगावली कानशिलात

Published On: May 02 2018 10:04AM | Last Updated: May 02 2018 10:04AMपिंपरी : प्रतिनिधी 

वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर दंडात्मक कारवाई करत असताना तरुणाने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात मारल्याची घटना वाकड येथे घडली. सुरज गोविंद परळकर (२८, रा. सायकर वस्ती, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. हिंजवडी वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस फौजदार भालेराव यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव हे रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास वाकडमध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी विना हेल्मेट आलेल्या परळकर याला पावती करण्यास सांगितले. या कारणावरून चिडलेल्या परळकर याने पोलिसाला शिवीगाळ करत हाताने कानशिलात मारली. तसेच धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

Tags :  motorcycle rider, slap, traffic police, pimpari, pune news