Wed, Sep 26, 2018 20:52होमपेज › Pune › पुणे : दोन मुलांसह आईची ‘इंद्रायणी’त उडी 

पुणे : दोन मुलांसह आईची ‘इंद्रायणी’त उडी 

Published On: May 23 2018 1:45AM | Last Updated: May 23 2018 1:38AMइंदोरी : वार्ताहर 

किरकोळ घरगुती वादातून झालेल्या भांडणातून महिलेने आपल्या दोन मुलांसह आंबी पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ही महिला बचावली असून, दोन्ही मुले मात्र नदीत बुडाली. यातील एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून, दुसरा चिमुकला अद्याप बेपत्ता आहे. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. 

अमन अवधेश केवट (4 वर्ष, रा. पॉलिहाऊस, रा. नाणोली तर्फे चाकण मावळ) असे बुडून मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे, तर अमर अवधेश केवट (1.5) हा बेपत्ता आहे. शकुंतला अवधेश केवट (26) ही महिला बचावली आहे. महिलेचा पती अवधेश जगन्नाथ केवट याने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळेगाव एमआयडीसीमधील पुष्पसंवर्धन उद्यानातील एका पॉलिहाऊस कंपनीत कामाला असलेल्या मूळच्या मध्यप्रदेशातील एका दाम्पत्याचे सोमवारी रात्री जेवण बनविले नाही या कारणावरून भांडण झाले. त्यातूनच हा प्रकार घडला.