Wed, Nov 21, 2018 23:34होमपेज › Pune › राज्यात ६ ते ८ जूनच्या आसपास मान्सून दाखल होणार 

राज्यात ६ ते ८ जूनच्या आसपास मान्सून दाखल होणार 

Published On: Jun 02 2018 7:26PM | Last Updated: Jun 02 2018 7:26PMपुणे : प्रतिनिधी 

राज्याच्या काही भागात ६ ते ८ जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होण्याचे संकेत असून, त्यानंतरच पावसाचा जोर वाढणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. याबरोबरच  मान्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती आहे. त्यामुळे  रविवारी  ईशान्येकडील आणखी काही राज्यांमध्ये मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मंगळवारपर्यंत ( ५ जून) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. 

बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकरण्यास पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे  शुक्रवरी मान्सूनने ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्याचा काही भाग व्यापला आहे. अरबी समुद्रात मान्सूनची  प्रगती झाली नाही. त्यामुळे सध्या मान्सूनची दक्षिण भारतातील वाटचाल धिम्या गतीने सुरू आहे.

सध्या मान्सूनने कर्नाटकची किनारपट्टी, त्याचबरोबर अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग व्यापला आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवस मॉन्सूनने या भागात प्रगती केली नाही. सध्या मान्सूनची संतगतीने वाटचाल सुरू आहे. पुढील दोन दिवसांत विषुवृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोर वाढणार आहे. त्यामुळे कर्नाटकच्या आणखी काही भागात मान्सूनची प्रगती होणार आहे.