Mon, Aug 19, 2019 05:17होमपेज › Pune › पैसे दिले तरच उचलणार कचरा

पैसे दिले तरच उचलणार कचरा

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 12:46AMवानवडी : वार्ताहर

पैसे मोजले तरच सोसायटी, हॉटेल, दुकान व बँकांचा कचरा उचलण्याचे काम साफसफाई कर्मचारी करहत असल्याची बाब समोर आली असून, जागेचा किंवा घराचा टॅक्स भरणार्‍या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. पालिकेचा कोणताही कर्मचारी पैसे घेत नाही, मात्र स्वच्छ संस्थेच्या लोकांना ठराविक शुल्क मोजावे लागणार असे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक डी. ए. आवटी यांनी सांगितले. पालिका कर्मचारी पैसे घेत असल्यास लोकांनी तक्रार देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वानवडी कोंढवा परिसरातील काही सोसायट्या व व्यावसायिकांच्याकडून कचरा उचलण्यासाठी महिन्याकाठी पैसे मागीतले जातात. यावरून सध्या लोकांमध्ये संभ्रम आवस्था निर्माण झाली आहे. कचरा उचलणारे व कचरा देणारे यांच्यामध्ये तू..तू..मै..मै च्या घटना घडत आहेत. यामध्ये वरिष्ठ पालिका आधिकारी वर्गाने हस्तक्षेप करून मध्यस्थी करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. स्वच्छ या संघटनेला कचरा उचलणे व साफसफाई करणे यासाठी पालिकेने आधिकार दिले असतील तर, ते ठरावीक रक्कम लोकांकडून गोळा करतात. मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणात काही लोक पैसे घेत असतील तर त्याचा आढावा घेतला जाईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. 

घरचा सर्व प्रकारचा टॅक्स भरून देखिल अन्य स्वरूपातून पैसे भरणे लोकांना परवडत नाही. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्वच्छ संस्था एका घरातून कचरा उचला तर 60 रूपये घेते. व्यवसायिक असेल तर 120 घेण्याचा आधिकार त्यांना आहे असे आधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. मात्र यातील काही कर्मचारी अधिक पैसे उकळतात त्यांच्यावर आजपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नाही, यासाठी लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेने स्वच्छ संस्थेशी केलेल्या करारानुसार घरातून कचरा उचलून घेवून गेले तर महिन्याकाठी स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्‍याला 60 रूपये द्यावे लागतील. आस्थापन दुकाने (व्यवसायीक) महिण्याकाठी 120 तर घोषीत वस्ती मधील नागरिकांना कचरा उचलणार्‍या स्वच्छ संस्थेच्या व्यक्तीला 40 रूपये द्यावे लागतील असा ठराव महापालिकेमध्ये केलेला आहे. याशिवाय आगाऊ पैसे घेणार्‍या कर्मचार्‍याची तक्रार नागरिकांनी करावी, असे आवाहन आवटी यांनी केले आहे.