Sat, May 25, 2019 23:04होमपेज › Pune › शिक्षक बदल्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार

शिक्षक बदल्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:13PMखडकवासला  : वार्ताह 

शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेतील    सुगम दुर्गम शिक्षक बदल्यांत कोणताही गैर प्रकार झाला नाही. सर्व बदल्या आँनलाईन पध्दतीने पारदर्शक झाल्या असल्याचा दावा केला आहे.असे असले तरी शिक्षकांच्या बदल्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे चित्र पुढे आले आहे. राज्यातील अति दुर्गम व अति मागास असलेल्या रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत धरणभागात दहा _-अकरा वर्षांपासून नोकरी करणार्‍या शिक्षकांना डावलून कमी काळ सेवा केलेल्या अपात्र शिक्षकांच्या लाखो रुपयांच्या देवाणघेवाणीतून शहरालगतच्या शाळांत बदल्या झाल्या आहेत.

पात्रता असूनही अति दुर्गम डोंगरी भागात असलेल्या शिक्षकांची   बदली झाली नाही.तर दुसरी कडे अपात्र शिक्षकांच्या बदल्या पुणे शहरालगतच्या शाळांत झाली आहे. दहा वर्षापेक्षा अधिक काळ रायगड जिल्ह्यालगतच्या अत्यंत दुर्गम शाळांत नोकरी करणारे शिक्षक वशिल्या अभावी दुर्गम भागातच राहिले आहेत. अशा शिक्षकांची संख्या  एकट्या पानशेत धरणभागात सर्वात अधिक आहे. जवळपास दहा असे शिक्षक आहेत.

पानशेत धरणाच्या दुर्गम भागातील भालवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद पाटील हे अकरा वर्षांपासून दुर्गम डोंगरी भागातील शाळांत नोकरी करत आहेत. त्यांनी सुगम दुर्गम बदल्यात ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. हवेली तालुक्यातील शाळांत बदलीसाठी विनंती केली होती. असे असताना त्यांची बदली झाली नाही. पाटील यांच्या पेक्षा कमी काळ पानशेत धरणाच्या दुर्गम भागात सेवा केलेल्या शिक्षकांच्या सुगम दुर्गम मध्ये बदल्या झाल्या आहेत. त्या पैकी अनेक शिक्षकांच्या बदल्या हवेली तालुक्यात ,पुणे शहरालगतच्या जिल्हा परिषदेच्या शाळांत झाल्या आहेत.

डोंगरी भागात  सहा - सात वर्षे सेवा करणारया शिक्षकांच्या बदल्या रातोरात पुणे महापालिकेत जाणारया गावातील तसेच शेजारील गोरहे बुदरूक आदी ठिकाणच्या  जिल्हा परिषद शाळांत झाल्या आहेत.महापालिकेत जाणारया गावातील शाळांत बदली होण्यासाठी दिड लाख तर हवेलीतील शाळांत बदली होण्यासाठी एक लाख रुपये अनेक शिक्षकांनी दिले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ऑनलाईन कामाचा अनुभव असलेल्या काही शिक्षकांनीच या मध्ये मध्यस्थी करून लाखो रुपयांची माया गोळा केली असल्याचे शिक्षकच सांगत आहेत.

स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद ते थेट वरिष्ठ कार्यालया पर्यंत सुगम दुर्गम बदल्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक अति मागास व अति दुर्गम डोंगरी भागातील , रायगड जिल्ह्यालगतच्या शाळांत दहा अकरा वर्षांपासून नोकरी करणारया शिक्षकांना डावलून कमी काळ सेवा केलेल्या अपात्र शिक्षकांच्या लाखो रुपयांच्या देवाणघेवाणीने बदल्या झाल्या आहेत.सुगम दुर्गम बदल्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी  करून कमी काळ सेवा केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यापेक्षा अधिक काळ नोकरी केलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात स्थानिक कार्यकर्ते व शिक्षकांनी  आली आहे.