Sun, Aug 25, 2019 23:46होमपेज › Pune › पुणे : सैन्यदलाकडून हवाई सफारी अभियानाचे आयोजन(video)

पुणे : सैन्यदलाकडून हवाई सफारी अभियानाचे आयोजन(video)

Published On: Mar 09 2018 12:15PM | Last Updated: Mar 09 2018 12:15PMनिमगांव केतकी : प्रतिनिधी

भारतीय सैन्य दलातील ९ पैराशुट फिल्ड रेजीमेंटची १ एप्रिल १९४३ साली स्थापना झाली होती. या घटनेला येत्या १ एप्रिलला ७५ वर्षे पूर्ण होतील. १९४३ मध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिमा नदीतीरावरील कुंभारगाव येथे पहीली  तोफ फायर केली होती. या निमित्ताने या हवाई सफरीच्या अनोख्या अभियानाचे आयोजन केले आहे. सफारीत कुंभारगाव -नाशिक -धुळे- माहु- आस्था- भोपाळ- झासी -ग्वाल्हेर आणि आग्रा असा तब्बल १४५३ किलोमीटरचा प्रवास एकूण १२ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे  निवृत्त कैप्टन प्रकाश नेरुळ्कर यांनी सांगितले. ब्रिगेडियर वंसत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सफरीस सुरुवात करण्यात आली .

हवाई सफरीचा प्रकार अत्यंत धाडसी व रोमांचक खेळ असून यात पक्षांप्रमाणे आकाशात उडण्याचा अनुभव येतो. तरुणांच्या मनामध्ये आत्मविश्वास अनुशासन आणि धाडसी कार्य करण्यास प्रोत्साहित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे उड्डाण  भारतीय सेनेच्या आर्मी अडव्हेंचर विंग द्वारा करण्यात आले आहे यामध्ये तीन अधिकारी २०जवान यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी पुणे येथील  निवृत्त कैप्टन प्रकाश निरुळकर कर्नल रमेश आपटे ब्रिगेडियर वंसत पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती.

या अभियानाचे  नेतृत्व  कर्नल विकेश व मेजर राहुल शर्मा  हवलदार अमरीत पाल चंद्रकांत महाडिक समशेर अजमेर मानसिंग बी एस देसले नायक ए.अरुल सचिन सुकविंदर सिंग यांनी हे उड्डाण यशस्वी केले. आकाशात उंच गेल्यानंतर त्यांनी गावावर फुलांची बरसात केली. ह्या कसरती पाहत  जिल्हा परिषदेच्या शाळकरी विद्यार्थीनी मोठा आनंद व्यक्त केला. 

गावच्या सरपंच जयश्री धुमाळ दादासाहेब दराडे प्रकाश वाघ विठ्ठल जोरी बाजीराव गावडे सिताराम नगरे यांच्यासह गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या स्वातंत्र्यपुर्व तोफखान्यास १ एप्रिलला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने सैन्यातील या गावातील आठवणींना पुन्हा उजळा देण्यात आला.