Wed, Feb 20, 2019 07:20होमपेज › Pune › एकबोटे शिक्रापूर पोलिस ठाण्यात; चौकशी सुरू

एकबोटे शिक्रापूर पोलिस ठाण्यात; चौकशी सुरू

Published On: Feb 23 2018 4:33PM | Last Updated: Feb 23 2018 4:54PMशिक्रापूर : वार्ताहर 

कोरेगाव-भिमा दंगलप्रकरणी आरोपी असलेले  मिलिंद एकबोटे शुक्रवारी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे. चिथावणीखोर भाषण करून दंगल भडकावल्याचा आरोप एकबोटे यांच्यावर असून, त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातून होत आहे. 

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हिंसाचार झाला होता. पुढील काही दिवस त्याचे लोण राज्यभर पसरले होते. एकबोटे यांनी भडकाऊ भाषण करून हिंसाचार घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंसाचारानंतर अनेक दिवस एकबोटे बेपत्ता होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, एकबोटे यांना तेथे काहीसा दिलासा मिळाला. एकबोटे यांनी पोलिसांना तपासात सहकार्य करावे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्या. शांतागौडा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

एकबोटेला अटक करायची आहे पण... : नांगरे पाटील

मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही?

संभाजी भिडे, एकबोटेंसमोर सरकार झुकले : प्रकाश आंबेडकर

कोरेगाव-भीमा हिंसाचार: फौजदाराला हृदयविकाराचा झटका