Thu, Nov 22, 2018 16:31होमपेज › Pune › पुण्यातील म्हात्रे पुलावरून नागरिकाने उडी मारली

पुण्यातील म्हात्रे पुलावरून नागरिकाने उडी मारली

Published On: Feb 07 2018 6:20PM | Last Updated: Feb 07 2018 6:20PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील म्हात्रे पुलावरून नदीपात्रात एका नागरिकाने उडी मारल्याचा प्रकार बुधवारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास समोर आला आहे. दरम्यान येथील नागरिकांनी पोलिस तसेच अग्निशामक दलाला माहिती दिली आहे. तात्काळ धाव घेऊन नागरिकाला बाहेर काढण्यात आले आहे. 

स्वप्नील सुधीर वैद्य (वय ३८) असे उडी मारलेल्याचे नाव आहे. यात तो जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.