Mon, Aug 26, 2019 00:12होमपेज › Pune › श्री क्षेत्र वीर म्हस्कोबा यात्रेस सुरूवात(व्हिडिओ)

श्री क्षेत्र वीर म्हस्कोबा यात्रेस सुरूवात(व्हिडिओ)

Published On: Jan 31 2018 9:47AM | Last Updated: Jan 31 2018 9:47AMसासवड : प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील  पुरंदर तालुक्यातील दहा दिवस चालणाऱ्या श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. मंगळवारी ( दि. ३० ) माघ शु. पौर्णिमेला मध्यरात्री २. ४० वाजता पारंपारिक श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला. 

ढोल-ताशांचा गजर, गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण, मानाच्या पालख्या, छत्र्या, अबदागिरींच्या भाऊगर्दीत, "नाथ साहेबांच चांगभल" चा जयघोष, तुतारी आणि शंखनादाच्या निनादात आणि मानाच्या काठ्यांसह नाथभक्तांची उत्साही हजेरी यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे हा विवाह सोहळा विशेष लक्ष्यवेधी ठरला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे लाखो नाथभक्तांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.