Wed, Mar 27, 2019 06:28होमपेज › Pune › नदीपात्रातील पहिल्या खांबाची उभारणी सुरु

नदीपात्रातील पहिल्या खांबाची उभारणी सुरु

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:04AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

शहरातील इतर मेट्रोमार्गांवरील बांधकामाप्रमाणेच नदीपात्रातील बांधकामानेही चांगलाच वेग घेतलेला आहे. नदीपात्रातील पहिल्या खांब उभारणीची सुरुवात झालेली आहे. खांब उभारणीसाठी लागणार्‍या ठोस पायाची उभारणी करण्यात आली असून, नदीपात्रात खोदाईचे काम जोमाने सुरू आहे. नदीपात्रात एकूण 59 खांब असणार आहेत, त्यातील पहिल्या खांबाची सुरुवात झाली आहे.

नदीपात्रातील मेट्रो मार्गावर पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीतील प्रतिनिधींकडून नुकतीच नदीपात्रातील कामाची पाहणी करण्यात आलेली आहे. त्यावरील निकालही लवकरच होईल; मात्र त्याआधीच महामेट्रोकडून आवश्यक ती काळजी घेऊन कामाला योग्य गतीने सुरूवात केली आहे. मुठेच्या पात्रात मेट्रोसाठी एकूण 59 खांब प्रत्येकी 16 ते 22 मीटर उंचीचे असणार आहेत. हे सर्व खांब नदीला समांतर असतील. नदीपात्रातील खोदाईच्या कामाच्या वेळेस पहिल्या 20 सेंटीमीटरचा मातीचा थर संवर्धन करून ठेवण्यात येणार आहे. 

मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर त्याच ठिकाणी हे थर बसवले जाणार आहेत, असे सावधगिरीच्या अनेक उपाययोजना करून नदीपात्रातील काम जोमाने सुरू असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.