Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Pune › सांगलीच्या बाबर टोळीला मोक्‍का कोठडी

सांगलीच्या बाबर टोळीला मोक्‍का कोठडी

Published On: Jan 31 2018 2:18AM | Last Updated: Jan 31 2018 2:09AMपुणे ः प्रतिनिधी 

भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्ती केल्याचा राग मनात धरून एकाला जातीवाचक शिवीगाळ करून गजांनी तसेच ब्लेडने वार करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या सांगली येथील बाबर टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्‍का) कारवाई करण्यात आली आहे. त्यांना विशेष मोक्‍का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 विक्रांत उर्फ छोट्या शंकर बाबर (42), रोहित रमेश बाबर (27), राहुल रमेश बाबर (26), मेघशाम उर्फ मोठ्या अशोक जाधव (24), घनशाम उर्फ बारक्या अशोक जाधव (22), विनायक उर्फ विनू यशवंत निकम (26), धनंजय उर्फ धना शैलेश भोसले (20 सर्व रा. सांगली) अशी पोलिस कोठडी झालेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. शेखर माने आणि ओंकार जाधव (दोघेही रा. सांगली) यांचा पोलिस शोध घेत आहेत. टोळीने केलेल्या हल्ल्यात फिर्यादी किरण रूपेश भंडारे, विकी दिवाकर कांबळे यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी किरण भंडारे यांनी त्यांचा मित्र सैफ आणि रोहीत बाबर यांच्यातील भांडणे सोडवली होती. परंतु, भंडारे याने भांडणे सोडविल्याचा राग मनात धरून परिसरात दहशत पसरवून जातीवाचक शिवीगाळ करून भंडारे व कांबळे यांच्यावर गजांनी, ब्लेडने वार करून दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला होता.   नागरिकांमध्ये दहशत पसरवत असून त्याच्या भितीने नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे या टोळीवर दि. 24 जानेवारी रोजी मोक्‍का अंतर्गत कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले.

विशेष सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी टोळीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने  मान्य केली.  तपास इस्लामपूर विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे करीत आहेत.