Tue, Oct 24, 2017 16:47होमपेज › Pune › ९१ वे साहित्य संमेलन निवडणूक :  ७ पैकी ४ अर्ज बाद

साहित्य संमेलन निवडणूक : ७ पैकी ४ अर्ज बाद

Published On: Oct 12 2017 3:33PM | Last Updated: Oct 12 2017 3:33PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या साहित्य क्षेत्रात मानाचे असलेल्या ९१ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे संमेलानाध्यक्ष पदासाठी एकूण सात अर्ज आले होते. त्यापैकी तीन अर्ज निश्‍चित करण्यात आले आहेत.

मसापच्या जवळच्या शाखेत अर्ज भरणे, उमेदवार तयार करणे, अंतर्गत राजकीयऐवजी साहित्यिक चढा-ओढीला देखिल  सुरूवात झाली आणि पुन्हा एकदा साहित्याचे पडघम वाजायला सुरूवात झाली. 

यात ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि अनुवादक रवींद्र गुर्जर यांचे अर्ज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे पाठविण्यात आले आहेत.तर रवींद्र शोभणे, किशोर सानप, श्रीनिवास वारूंजीकर,विश्‍वास वसेकर यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.