Fri, May 29, 2020 00:49होमपेज › Pune › मराठा आरक्षण : पुणे - नाशिक महामार्गावर जाळपोळ; दगडफेक 

पुणे - नाशिक महामार्गावर जाळपोळ; दगडफेक 

Published On: Jul 30 2018 2:08PM | Last Updated: Jul 30 2018 2:08PMचाकण : वार्ताहर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्ग चाकण (ता. खेड) येथे रोखून धरला होता. तळेगाव चौकात सकाळी अकरा वाजलेपासून पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. या आंदोलनाला थोड्यावेळातच हिंसक वळण लागले. चाकण मध्ये अनेक वाहनांची  तोडफोड आणि चार एसटी जाळण्यात  आल्या. यावेळी आंदोलकांनी जवळपास शंभरहून जास्त गाड्यांवर दगडफेक केली.