Sat, Nov 17, 2018 04:27होमपेज › Pune › मराठा आरक्षण आंदोलन; बारामतीत ST बस पेटवली 

मराठा आरक्षण आंदोलन; बारामतीत ST बस पेटवली 

Published On: Jul 23 2018 9:56PM | Last Updated: Jul 23 2018 9:56PMबारामती : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरु असलेल्या ठोक आंदोलनाला बारामती तालुक्यात सोमवारी ( दि. २३ ) हिंसक वळण लागले. बारामती - फलटण रस्त्यावर पाहुणेवाडी येथे अज्ञात व्यक्तिनी एसटी बसवर दगडफेक करत बस पेटवून दिली. सुदैवाने या घटनेत बसचे फारसे नुकसान झाले नाही. 

मराठा आरक्षणासाठी राज्यभर सध्या आंदोलन सुरु आहे. पंढरपूरात मुख्यमंत्र्याना पुजेपासून रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. सोमवारी बारामतीतही सकल मराठा समाज व संभा ब्रिगेडने आंदोलन केले होते. सोमवारी दुपारी आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर मराठा समाजातील तरुणांच्या भावना अधिक तीव्र झाल्या, त्यातून पाहुणेवाडीत बसवर दगडफेक करत ती पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बारामती तालुक्यात सध्या संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे.