Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Pune › मराठा आरक्षणासाठी पुण्यात युवकाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी पुण्यात युवकाची आत्महत्या

Published On: Aug 03 2018 5:17PM | Last Updated: Aug 03 2018 5:16PMपुणे : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकारकडे आरक्षणाची मागणी करूनही सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलनाचा आवाज तीव्र करण्यासाठी विविध मार्ग अवलंवले जात आहेत. आंदोलन तीव्र होत असतानाच पुण्यात एका युवकाने रेल्‍वेखाली उडी घेऊन आत्‍महत्‍या केली आहे.

आत्‍महत्या केलेल्या युवकाचे नाव दत्तात्रय शिंदे (वय ३४) आहे. आत्‍महत्‍या करण्यापूर्वी दत्तात्रय यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी येथील रहिवासी आहेत.