Tue, Feb 19, 2019 13:03होमपेज › Pune › पुणे : दौंड तालुक्यातील बाजारपेठा बंद 

पुणे : दौंड तालुक्यातील बाजारपेठा बंद 

Published On: Jul 24 2018 11:52AM | Last Updated: Jul 24 2018 11:52AMयवत  : वार्ताहर

मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी दौंड तालुक्यातील यवत व वरवंड गावाची बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दर्शवण्यात आला. तालुक्यातील यवत व वरवंड या दोन्ही गावाच्या बाजारपेठा मोठ्या आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ते गावामधील व्यासायिकांना विनंती करत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करत आहे. या आवाहनाला स्थानिक व्यापारी वर्गाने देखील मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे.

गंगाखेड येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केलेल्या आंदोलनात जलसमाधी घेत जीव गमावला. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.