Fri, Feb 22, 2019 16:12होमपेज › Pune › पवारांच्या निवास स्थानासमोर गुरुवारी मराठा समाजाचा ठिय्या

पवारांच्या निवास स्थानासमोर गुरुवारी मराठा समाजाचा ठिय्या

Published On: Aug 06 2018 8:58PM | Last Updated: Aug 06 2018 8:58PMबारामती : प्रतिनिधी 

आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून बारामतीत ठिय्या मांडलेल्या सकल मराठा समाजाने गुरुवारी (दि. ९) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानासमोर ठिय्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामती शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने २ ऑगस्टपासून येथील बारामती नगरपरिषदेसमोरील रस्त्यानजीक ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ८ तारखेपर्यंत आंदोलनस्थळी विविध कार्यक्रम घेत राज्य शासनाचे आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात येत आहे. दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडण्याचा निर्णय सोमवारी (दि. ६) समाजाकडून जाहीर करण्यात आला.

खासदार पवार हे निरा-बारामती रस्त्यावर माळेगावच्या हद्दीत गोविंदबाग येथे राहतात. गोविंदबागेसमोर सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत ठिय्या मांडला जाणार आहे. शहर व तालुक्यातील लाखो समाजबांधव, भगिनींनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समाजाकडून करण्यात आले आहे.