Thu, Apr 25, 2019 18:54होमपेज › Pune › मान्सून उद्या महाराष्ट्रात

मान्सून उद्या महाराष्ट्रात

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी 

नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) मंगळवारी कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडू, रायलसीमा व आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, पश्‍चिम मध्य बंगालचा उपसागर व्यापला. दरम्यान, मान्सून आज (बुधवार) गोव्यात एंट्री करणार असून, उद्या (गुरुवार) तळ कोकणात तो डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दि. 7 ते 12 जूनदरम्यान कोकण किनारपट्टी, मुंबई येथे वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवसात मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण निर्माण होत असून, संपूर्ण कर्नाटक, संपूर्ण गोवा, तळ कोकणाचा काही भाग, आंध्र प्रदेश व तेलंगणाचा उर्वरित भाग येथे तो पोहोचेल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. राज्यात उष्णतेच्या झळा कमी झाल्या आहेत.